सुखांना येताना लाख अडथळे... 5:15 AM

सुखांना येताना । लाख अडथळे ।
वाटेतच ढळे । बळ त्यांचे ।।


दुःखांना परंतु । सहज प्रवेश ।
तयांचा आवेश । अबाधित ।।
सुखांचे स्वागत । दुःखांना नकार ।
कोण करणार । तुझ्याविना ?।।


विझता विझेना । व्यथांचा वणवा ।
स्थितांचा तो थवा । कुठे आहे ?।।

उरी ज्वालामुखी । रोज नवी नवी ।
शब्दांचा गारवा । कुठे आहे ?।।

होते लाही लाही । भोगता दुरावा ।
जिवाला विसावा । कुठे आहे ?।।





1 comments:

Pratik Balel said...

श्रावणातल्या मेघा जरा थांब
माहेराच्या माझ्या मैत्रिणी ला सांग
मी खूप सुखात आहे
दुखा: तू जरा लांबच थांब ]

Post a Comment