स्पर्श अनं हर्ष... 1:59 AM

संध्याकाळ जवळ आली की, माझं असं होतं...
तुझी आठवण दाटून येते अनं मन पिसं होतं...

माणसामध्ये असून सुद्धा
मी अगदी एकटी असते,
ळवावरचा थेंब जसा
त्यावर
बसून वेगल़ा असतो !

मला व्याकुळलेलं पाहून
सूर्य क्षणभर रेंगा
तो...
इंद्रधनू होतो अन
सात रंगांत ओघ
तो...!

आभा झुकतं पश्चिमेला
आणि...
थोड़ी कुंद हवा जाते त्याच्या सोबतीला...
वाऱ्यावर लहरत येतो
तुझ्याच आठवनींचा थवा...

एकाएकी दरउठतो
रातराणी येते फुलून...
तू आता येतोस याची
पटते मजला खू...!

मग...
माझ्या पैंजनांची छमछम
आणि...
कानामागे तुझे श्वास...
चोहिकडे भरभरून राहतात
घमघमणारे तुझे भास...!

खरंच,
संध्याकाळ जवळ आली की,
माझं असं होतं...
तुझी आठवण दाटून येते...
अन...
मन पिसं होतं...!!!











प्रिय... 9:56 AM

प्रिय स्मृतिरूप--- ,

तुझी सोबत नसलेल्या
माझ्या नुसत्या असण्याला
काय अजूनही 'मी' म्हणायचं...?


...