

स्पर्श अनं हर्ष... | 1:59 AM |
Filed under:
|
संध्याकाळ जवळ आली की, माझं असं होतं...
तुझी आठवण दाटून येते अनं मन पिसं होतं...
माणसामध्ये असून सुद्धा
मी अगदी एकटी असते,
अळवावरचा थेंब जसा
त्यावर बसून वेगल़ा असतो !
मला व्याकुळलेलं पाहून
सूर्य क्षणभर रेंगाळतो...
इंद्रधनू होतो अन
सात रंगांत ओघळतो...!
आभाळ झुकतं पश्चिमेला
आणि...
थोड़ी कुंद हवा जाते त्याच्या सोबतीला...
वाऱ्यावर लहरत येतो
तुझ्याच आठवनींचा थवा...
एकाएकी दरवळ उठतो
रातराणी येते फुलून...
तू आता येतोस याची
पटते मजला खूण...!
मग...
माझ्या पैंजनांची छमछम
आणि...
कानामागे तुझे श्वास...
चोहिकडे भरभरून राहतात
घमघमणारे तुझे भास...!
खरंच,
संध्याकाळ जवळ आली की,
माझं असं होतं...
तुझी आठवण दाटून येते...
अन...
मन पिसं होतं...!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)

Copyright © 2008 MarathiMaziBoli.blogspot.com | Design by Reshma S.[Vikhroli]
0 comments:
Post a Comment