सारी हरवली सृष्टी...! 5:15 AM

खोटे कशाला मी बोलू ?
माझ्यासाठी आठवण
कसे जगावे सांग ना
तुझ्या सहवासाविण...?

सारी पोकळी-पोकळी
रिती जीवन-ओंजळ
नाही शब्द-स्पर्श-रुप
रस-गंध-मृगजळ

एका तुझ्या जाण्यामुळे
सारी हरवली सृष्टी
आणि पाची इंद्रियांनी
माझ्या, गमावली 'दृष्टी'





1 comments:

Pratik Balel said...

पण माझा रंग आहे . .

झाली आहे चलबिचल
या माझ्या मनाची
वाट हरवली आहे
सुन्दर जीवनाची
मनही माझे
तुझीच वाट पाहे . .
घाबरू नकोस प्रिये,
पण माझा रंग आहे . .

इतर तर फार असतील,
पण माझ्यासारखा मीच . .
मी तर आहे फार सभ्य,
माझी तक्रार का उगीच?

जाणीव शुन्य या जगात,
फक्त तुझी साथ हवी आहे . .
घाबरू नकोस प्रिये,
पण माझा रंग आहे . .

मी नाही मानत. .
जात-पात-धर्म,
पण कोणाला समजेल का,
माझ्या बोलण्याचे मर्म?

कधी होशील दुखी,
तर कधी फार रडशील . .
कधी झालीच चुकी,
तर मग काय करशील?

माझ्या कविते मधेच,
याचे उत्तर आहे . .
घाबरू नकोस प्रिये,
पण माझा रंग आहे . .



PRatik . .

Post a Comment