पण तुझा रंग नाही...! 12:03 PM

सुखे अजूनही येती
कशी एकटीने भोगू...?
तुझी सलते उणीव
किती सले काय सांगू...??

सुखांच्या या समुद्रात
आनंदाचा थेंब नाही...
रंगपंचमी रंगते
पण तुझा रंग नाही...!

अभिनंदनाचे क्षण
येती जाळत जाळत...
तुला स्मरते एकान्ती
अश्रू ढाळत ढाळत...!





1 comments:

Pratik Balel said...

पण माझा रंग आहे . .

झाली आहे चलबिचल
या माझ्या मनाची
वाट हरवली आहे
सुन्दर जीवनाची
मनही माझे
तुझीच वाट पाहे . .
घाबरू नकोस प्रिये,
पण माझा रंग आहे . .

Post a Comment