मृत्यु सोबत चालला... 7:41 PM

आणू कुठून मी बळ
पेलावया हा डोंगर ?
क्षणाक्षणाने वाढते
ओझे माझ्या उरावर...


एक एक क्षण जसा
उग्र काळाचाच दंश...
घुसे काळजात माझ्या
तीव्र विषाचाच अंश...!

किती पचवली दुःखे
तुझ्या संगती हसत...
आता पचेनात सुखे
झाली माझी वाताहत !

जिथे सुखांची ही दशा
तिथे कशी सोसू दुःखे?
क्षणोक्षणी काळजात
घुसतात त्यांची नखे !

वेदनेचा महापूर
श्वास कोंडला कोंडला...
तुझी सोबत सुटली
मृत्यु सोबत चालला...



2 comments:

Unknown said...

hi reshma.....
i dunno wat to say!!
it's really amazing words u have combined...
so meaningful and m so touched!!!!

keep it up dear...
lol

माझी माय मराठी said...

कोणिही उचलुन न्यावे मी कोणाला का द्यावे?

Post a Comment